मुंबई पत्तन प्राधिकरणाचा तपशीलवार इतिहास
1668 मध्ये शाही सनदेव्दारे मुंबई बंदर आणि बेट ईस्ट इंडिया कंपनीकडे हस्तांतरित केल्यानंतर, बंदराच्या विकासास आकार मिळू लागला. व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी कस्टम हाऊस, गोदाम, सुकी गोदी बांधणे इत्यादी विविध उपाय कंपनीने हाती घेतले. 1813 मध्ये, ब्रिटीश संसदेच्या एका कायदयाने ईस्ट इंडिया कंपनीची व्यावसायिक मक्तेदारी संपुष्टात आली. त्यामुळे बंदराच्या व्यापारात मोठी तेजी आली. 1858 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यातून मुंबई बंदर थेट ब्रिटीश राजसत्तेच्या अधिपत्याखाली आले. 1873 मध्ये मुंबई बंदराच्या कारभारासाठी सध्याच्या वैधानिक स्वायत्त विश्वस्त मंडळाची स्थापना करण्यात आली. 1869 मध्ये सुएझ कालवा तयार झाल्यावर मुंबईच्या सागरी व्यापारात क्रांती झाली. त्याने आयात-निर्यात व्यापाराची संपूर्ण परिस्थिती पूर्व किनार्यावरून पश्चिमेकडे हलवली आणि मुंबई बंदर भारताचे प्रमुख प्रवेशव्दार बनले. ओली गोदी 1875 मध्ये भारतात मुंबई येथे बांधण्यात आलेले पहिली (वेट डॉक) म्हणजे ससून डॉक होते आणि त्यानंतर 1880 आणि 1888 मध्ये अनुक्रमे प्रिन्सेस आणि व्हिक्टोरिया डॉक्स बांधण्यात आले. तथापि, इंदिरा डॉकमधील "ऑफशोअर कंटेनर टर्मिनल" च्या संबंधात कंटेनरसाठी तात्पुरते स्टॅकिंग यार्ड करण्यासाठी सल्लागार क्षेत्राचे रूपांतर करण्यासाठी प्रिन्सेस आणि व्हिक्टोरिया डॉक भरले गेले आहेत. अलेक्झांड्रा डॉकचे जानेवारी 1972 मध्ये इंदिरा डॉक असे नामकरण करण्यात आले. मुंबईच्या गोदीपैकी सर्वात आधुनिक गोदी 1904-1914 मध्ये बांधण्यात आली. पेट्रोलियम उत्पादने आणि द्रव रसायने हाताळण्यासाठी, पिर पाव येथे 1923 मध्ये एक जेट्टी बांधण्यात आली आणि 47,000 विस्थापन टनांचे टँकर हाताळण्यास सक्षम असलेली नवीन आधुनिक जेट्टी डिसेंबर 1996 मध्ये कार्यान्वित झाली. जवाहरव्दीप येथे तीन धक्क्यांसह आधुनिक तेल टर्मिनल 1952-1956 मध्ये बांधण्यात आले. 1,25,000 विस्थापन टनांपर्यंत टँकर हाताळण्यास सक्षम चौथा तेल धक्का 1980-1984 दरम्यान बांधण्यात आला.