मुंबई पत्तन प्राधिकरण लागू असलेल्या ई-कचरा व्यवस्थापन नियमांनुसार, सर्व इलेक्ट्रॉनिक कचरा अधिकृत पुर्नप्रक्रियाकारांकडे सुपूर्द करून त्याची पर्यावरणाच्या दृष्टीने जबाबदार पद्धतीने विल्हेवाट सुनिश्चित करते. पुर्नप्रक्रियेसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या ई-कचऱ्याचे वर्षनिहाय प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
|
आर्थिक वर्ष |
अधिकृत पुर्नप्रक्रियाकारांकडे पाठविलेल्या ई- कचऱ्याचे प्रमाण (मेट्रिक टन) |
|
2022-2023 |
25.5 |
|
2023-2024 |
17.74 |
|
2024-2025 |
6.06 |
|
2025-2026 |
0.810 |
वैयक्तिक ई-कचरा व्यवस्थापनासाठीचा उपक्रम
शाश्वत कचरा व्यवस्थापनाप्रती असलेल्या आपल्या बांधिलकीचा एक भाग म्हणून तसेच कर्मचारी आणि बंदर वापरकर्त्यांमध्ये जबाबदार विल्हेवाट पद्धतींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मुंबई पत्तन प्राधिकरणाने बंदराच्या कार्यालयीन परिसरात आणि वसाहतींमध्ये निश्चित केलेल्या ठिकाणी ई-कचरा संकलनासाठी चार स्वतंत्र संकलन पेट्या स्थापित केल्या आहेत. या पेट्यांमध्ये संकलित करण्यात आलेला ई-कचरा पुढील प्रक्रियेसाठी अधिकृत पुर्नप्रक्रियाकारांकडे पाठविला जातो. यामुळे ई-कचऱ्याची सुरक्षित हाताळणी आणि संबंधित नियामक तरतुदींचे अनुपालन सुनिश्चित केले जाते.